मुंबई । शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यावरुन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. पहिली ते चौथीच्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पालिका, निवडणूक आयोग आणि सरकारने बोलावलं. हे शिक्षक घेतल्यावर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण याची काही माहिती नाही. या मुद्यावर बोलत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला कारभाराबद्दल फटकारलं.
शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितले आहे, रुजू व्हा. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की, तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
मुंबई महापालिकेच्या ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात येतं. एवढे शिक्षक बाहेर काढले तर मुलांना शिकवणार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दर पाच वर्षाने निवडणुका येतात त्यावेळी तुमची यंत्रणा सज्ज का ठेवत नाही. त्या विद्यार्थ्यांचा काय दोष ? शिक्षक हे काय निवडणुकीचं काम करण्यासाठी आले का?, अशा शब्दात राज ठाकरेंनी खडे बोल सुनावले.















Discussion about this post