मुंबई । शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या भावी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
पहिला टप्प्यात 30 हजार आणि दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जाणार असल्याचेही केसरकर म्हणालेत. औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचे काम रखडले होते. आता हायकोर्टाने स्थगिती उठवली आहे, त्यामुळे शिक्षक भरतीचे (Teachers Recruitment) परिपत्रक (GR) आजच काढण्यात येणार असल्याचे केसकरांनी सांगितले आहे.
राज्यात शिक्षण व्यवस्थेचा दर्जा घसरल्यानंतर राज्यातील शिक्षकांची संख्या हे महत्त्वपूर्ण कारण देण्यात आले होते. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने त्यांच्यावर अधिकचा भार येत असल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती होणे गरजेचे आहे.
Discussion about this post