राज्यातील हजारो पात्रताधारकांचे लक्ष लागलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. एकूण २१ हजार ६७८ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा समावेश आहे.
22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आणि त्या पार्श्वभूमीवर विभागाने जिल्हा परिषदेच्या 10 टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदांमध्ये सध्या 70 टक्के रिक्त जागांवर पदभरती होणार आहे. ही भरती त्या-त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन केली जात आहे. तसेच आरक्षणाच्या बिंदू नामावली तपासून 80 टक्के पदांसाठी केली जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांच्या 12522,18 मनपाच्या- 2951, 82 नगर पालिका, परिषदाच्या-477 व 1123 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 5728 अशा 21678 रिक्त पदाच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, गटनिहाय रिक्त पदांमधे इ. 1 ते 5 वी-10240, इ. 6 ते 8 वी 8127, इ. 9 ते 10 वी -2176, इ. 11 ते 12 वी – 1135 याप्रमाणे आहेत. तर माध्यमनिहाय रिक्त पदे- मराठी-18.373, इंग्रजी-931, उर्दू-1850, हिन्दी-410, गुजराथी-12, कन्नड-88, तामिळ-8, बंगाली-4, तेलुगू-2 याप्रमाणे आहेत. शिवाय पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे- मुलाखतीशिवाय-16799, मुलाखतीसह-4879 इतकी पदे आहेत.















Discussion about this post