मुंबई । महाराष्ट्रातील थंडी कमी होत असून हळहळून तापमानात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान ३५ अंशाच्या वर गेले आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमान वाढले असून पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सोमवारी राज्यात कमाल तापमानात वाढ दिसून आली. सकाळपर्यंतच्या २४ ताांमध्ये ब्रम्हपूरीसह जेऊर आणि अकोला येथील तापमान ३५ अंशांपार गेले. उर्वरित जळगावसह राज्यात बहुतांश ठिकाणी ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान तापमान होते. राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच पारा ३५ ते ३७ अंशांवर गेला आहे. यात पुणे जिल्ह्यासह शहरातील सर्वंच भागांचे तापमान राज्यात सर्वात जास्त आहे.
उकाडा वाढल्यामुळे आणि उन्हाच्या झळा लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येत्या काही दिवसांत राज्यातील किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
Discussion about this post