मुंबई/जळगाव । राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. उन्हाळ्याची चाहूल लवकरच लागल्याने तापमान वाढले आहे. राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंशावर गेलं आहे. जळगावचे तापमान देखील ४० अंशावर गेलं. यामुळे असाह्या होणाऱ्या उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही-लाही होत आहे.
हवमान विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असेही सांगण्यात आले आहे. राज्यात यंदा होळीच्या आधीपासून म्हणजे, फेब्रुवारीच्या मध्यान्हापासूनच उन्हाळ्याची सुरुवात झाली. मार्च महिना सुरू होताच तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. यंदा सरासरीपेक्षा तापमान अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उकाडा वाढल्याने वीज आणि पाण्याचा वापर देखील वाढला आहे.
विदर्भात तापमानाचा पारा वाढला –
होळीनंतर तापमानात वाढायला सुरवात होत असताना आताचा तापमानाचा पारा हा 41 अंशाचा घरात जाऊन पोहचला आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भातील ११ पैकी 6 जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपुढे आहे. मंगळवारी अकोल्यात सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. अकोला, ब्रम्हपुरी, चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगाने वाढत आहे. नागपूर आणि वर्धा ही शहरे देखील तापू लागलीय. हवामान विभागाने विदर्भातील काही शहरांना ११ ते १३ मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मंगळवारपासूनच विदर्भात उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली. दरम्यान सोलापूर, नाशिक, अहमदनगर, मुंबई, ठाणे आणि कोकणातही उन्हाची रखरख आणि अंगाची लाही लाही करणारा उकाडा वाढला आहे. पुढील काही दिवस सूर्य आग ओखणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसेंदिवस उकाड्यात वाढ होत आहे. सकाळी आठ वाजताच सुर्य नुसती आग ओकण्यास सुरवात करीत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका जाणवत आहे.
Discussion about this post