नंदुरबार । राज्यात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या झळांचा फटका राज्याच्या अनेक भागात दिसू लागला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला नंदुरबार शहरांचा पारा 39.5 पोहोचला आहे. पुढील पाच दिवस उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्यातील उन्हाचा तडाखा वाढताना दिसत असून गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेने कहर केलाय. सोमवारी पुणे, नंदुरबार शहरांचा पारा 39.5, तर अकोला शहराचे तापमान 38.8 अंश सेल्सिअसवर गेलाय. मागील काही दिवसांपासून कमाल तापमान 35 अंशांवर असलेल्या नाशिक शहरातील तापमानाचा पारा सुद्धा वाढलाय.
सोमवारी उष्णतेची लाट चांगलीच जाणवली. पुणे, नंदुरबार, मुंबई ही शहरे चांगलीच तापली होती. मात्र, काही भागांतील कमाल तापमानात किंचित घट झाल्याची नोंद करण्यात आली. कमाल तापमानाचा पारा एक अंशाने कमी झाला होता. मात्र पुण्यासह, नंदुरबार आणि अकोला शहरांचा पारा सलग तिसर्या दिवशी सर्वाधिक ठरला. नाशिकमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला असून तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Discussion about this post