जळगाव । गेल्या काही दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यातील वातावरण बदल पाहायला मिळाला. कधी अवकाळी पाऊस तर थंडीचा कडाका तर कधी उन्हाचा तडाखा असे तिहेरी वातावरण पाहायला मिळेल. मात्र आता उन्हाचा पारा वाढू लागला आहे. उत्तर भारतामध्ये येणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे, परंतु बंगालच्या उपसागरातून येणान्या प्रति चक्रीय वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात फक्त विदर्भामध्ये आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे तेथे तुरळक ठिकाणी बेमोसमी पावसाची शक्यता आहे.
मात्र विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तेथे बाप्प ओढले गेल्यामुळे विदर्भ वगळता उर्वरित राज्यात वातावरण हे कोरडे आणि आकाश निरभ्र राहील, त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत वाढ होणार असून किमान आगि कमाल तापमानात २ अंशांनी सरासरी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे.
रविवारीही राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे असल्याने कोणाची तीव्रता वाढलो होती. १२ मार्च नंतर वातावरणामध्ये अधिक बदल होतील व उन्हाचा तडाखा वाढेल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. सर्वसाधारणपणे होळी सणानंतर उन्हाचा कड़ाका वाढत असतो. मात्र, यंदा होळीपूर्वीच उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
Discussion about this post