जळगाव । सध्या तापमानात सतत बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तापमानात घट झाल्याने जळगावात थंडीचा गारठा जाणवला. मात्र आता किमान-कमाल तापमानात अचानक वाढ झाल्याने थंडीचा गारठा गायब झाला आहे. रविवारी जळगावचे किमान तापमान ३६ अंशांवर तर कमाल तापमान १७ अंशांवर पोहोचले. दुपारी उन्हाच्या झळा जाणवल्या.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीमधील काही दिवस जळगावातील तापमानाचा पारा ९ ते १० अंश सेल्सिअस पर्यंत होता. यामुळे जळगावकरांना थंडीचा कडाका जाणवला. मात्र आता तापमानात वाढ झाल्याने थंडीचा गारठा हरवला आहे.
तापमान ३६ अंशांवर गेले असून यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याचे हे संकेत आहे. मात्र दुसरीकडे उत्तर व पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान पुन्हा थंडीचा कडाका जाणवणार आहे. मराठवाड आणि विदर्भात किमान तापमान सरासरीइतके राहणार असले तरी गार वाऱ्यांमुळे वातावरणात गारवा जाणवणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवल्ला आहे. उत्तर भारतात कमी दिवसांच्या अंतराने एकापाठोपाठ पश्चिमी चक्रवात येत असल्याने तसेच मध्य भारतात प्रत्यावर्ती वाऱ्याने पॅटर्न बदलल्याने उत्तरेत जोरदार पाऊस, हिमवृष्टी आणि गारपिटी शक्यता आहे.















Discussion about this post