राज्य महसूल विभागात तलाठी गट ‘क’ संवर्गातील पदांसाठी मोठी भरती सुरु असून या भरतीद्वारे ४ हजार ६४४ जागा भरल्या जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. आता उमेदवारांना दि. 25 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदांचे नाव – तलाठी
शैक्षणिक अर्हता
01) उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. 02) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-2012 /प्र.क्र277/39, दि. 4/2/2013 मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- 2000/प्र.क्र61/2001/39, दि. 19/03/2003 नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 04) माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
01) पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन 02) आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
परीक्षा शुल्क :
साधारण गटासाठी एक हजार, तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल.
वयोमर्यादा :
तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे.
परीक्षेचे स्वरूप
२ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.
वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
Discussion about this post