अहमदाबाद । गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र कुमार वगळता सरकारमधील १६ मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज १७ ऑक्टोबर रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ गांधीनगरमधील महात्मा मंदिरात पार पडला. यावेळी नव्या २५ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात १६ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये हर्ष संघवी यांनी गुजरातचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जितेंद्र वाघानी आणि अर्जुन मोढवाडिया यांनी गांधीनगरमध्ये गुजरात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
नवीन गुजरात मंत्रिमंडळात एकूण २५ मंमंत्र्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा जडेजा या वयाच्या ३५ व्या वर्षी मंत्री झाल्या. मोरबीच्या आमदार कांती अमृतिया यांनी शपथ घेतली. त्या कट्टर पाटीदार समाजाच्या प्रमुख आहेत आणि सहा वेळा विधानसभेत निवडून आल्या आहेत.
अरावली प्रदेशातील भिलोदाचे प्रतिनिधित्व करणारे निवृत्त आयपीएस अधिकारी पी.सी. बरंडा यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. कच्छ जिल्ह्यातील अंजार येथील आमदार त्रिकम छंगा यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. ते अहिर समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि कच्छ जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. नवसारीतील गंडेवी येथील आमदार नरेश पटेल यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी यापूर्वी मंत्री म्हणून काम केले आहे आणि ते अनुसूचित जमातीचे आहेत. वाव येथील आमदार स्वरूपजी ठाकोर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आणि दीसाचे आमदार प्रवीण माळी यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.
गुजरात सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात ‘या’ लोकांचा समावेश
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या व्यतिरिक्त त्रिकम बिजल छांघा, स्वरूपजी सरदारजी ठाकोर, प्रवीण माळी, ऋषिकेश पटेल, पी.सी.बरंडा, दर्शना वाघेला, कांतीलाल अमृतिया, कुंवरजीभाई बावलिया, रिवाबा जडेजा, अर्जुन मोधवाडिया, डॉ.प्रद्युम्न वाजा, कौशिक रावजी, कौशिक रावजी, सोनिया गांधी, डॉ. सोलंकी, कमलेश पटेल, संजय सिंह महिदा, रमेश कटारा, प्रफुल्ल पानसारिया, हर्ष संघवी, मनीषा वकील आणि ईश्वर सिंह पटेल यांचा नव्या मंत्र्यांच्या यादीत समावेश















Discussion about this post