मुंबई : सध्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचार सभेसाठी नेते ममंडळी गुंतले असून याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवारी घडली आहे. या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत.
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत आहेत. त्यांची काल कोकणात सभा होती. त्यानंतर आज ते बारामतीकडे जाणार होत्या. त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले. परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. या अपघातामध्ये पायलेट सुखरुप आहे.
तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.चौकशीनंतर अपघाताचे कारण समोर येणार आहे. हेलिकॉप्टर कोसळण्याची दृश्य अंगावर काटा निर्माण करणारी आहेत.















Discussion about this post