Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 31, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न
बातमी शेअर करा..!

जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत सर्वसमावेशक, वस्तुनिष्ठ व धोरणात्मक सर्वेक्षण राबविण्यात येत असून, या सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक संपन्न झाली.

या सर्वेक्षणामध्ये विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार, दिव्यांग तसेच विविध कारणांनी एकट्या राहणाऱ्या महिलांची अचूक संख्या, त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता आदी बाबींची सविस्तर माहिती संकलित करण्यात येणार आहे. संकलित माहितीनुसार गरजाधारित व परिणामकारक उपाययोजना राबविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हे सर्वेक्षण बिनखर्चिक, समन्वयित व प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO), समाजकार्य (MSW) महाविद्यालये तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सर्वेक्षणाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांची वयोगटनिहाय व सामाजिक घटकानुसार माहिती संकलित करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये विधवा महिलांची संख्या सर्वाधिक १ लाख ९ हजार ९८१ इतकी असून, घटस्फोटीत ३ हजार ४१३, परित्यक्ता अथवा माहेरी दिलेली ४ हजार ५९, निराधार व आजारग्रस्त १ हजार ४६५, कुटुंबापासून वेगळ्या राहणाऱ्या १ हजार ३३६, अविवाहित (30 वर्षांपेक्षा जास्त) १ हजार ६७४, तर इतर कारणांमुळे एकट्या राहणाऱ्या १३५ महिला असल्याची नोंद आहे.

वयोगटानुसार पाहता ३० ते ४४ वयोगटात १९ हजार ९५, ४५ ते ५९ वयोगटात ३७ हजार २३१ तर ६० वर्षांवरील वयोगटात ६३ हजार १६४ महिला असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार जामनेर (१५,१६२), रावेर (१२,१९५) व पाचोरा (७,८१५), चाळिसगाव (१११९२) तालुक्यांत एकल महिलांची संख्या तुलनेने अधिक असून, अमळनेर, पारोळा, चोपडा, यावल, भडगाव, एरंडोल, धरणगाव, मुक्ताईनगर, बोदवड , जळगाव, भुसावळ, तालुक्यांतही लक्षणीय संख्येने एकल महिला आढळून आल्या आहेत.बैठकीदरम्यान सर्वेक्षणाची कार्यपद्धती, विभागनिहाय जबाबदाऱ्या, क्षेत्रनिहाय समन्वय, माहिती संकलन व विश्लेषणाबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. एकल महिलांचे सक्षमीकरण हे केवळ सामाजिक नव्हे तर प्रशासकीय प्राधान्य असून, प्रत्येक पात्र महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला.

या बैठकीस अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ,जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जि. प. जळगाव तहसिलदार संगायो, अ-वर्ग न. पा. क्षेत्र, तहसिलदार संगायो, सह आयुक्त, नगरविकास शाखा, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हास्तरीय समन्वयक, NULM / City Mission Manager, जळगाव शहर महानगरपालिका
मूळजी जेठा महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे समाजकार्य विभाग प्रमुख विभाग, विद्यार्थी कल्याण समिती व NSSचे संचालक उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

Next Post

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page