मुंबई । आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांकडून तयारी सुरु करण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते महायुतीच्या पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. अशातच काँग्रेस पक्षाच्या माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गळ घालण्यास सुरवात करण्यात आली आहे.
परतूर विधानसभेचे कॉंग्रेस चे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचा उद्या अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. परतुर- मंठा मतदारसंघचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते सुरेशकुमार जेथलिया हे उद्या परतुर मध्ये सकाळी 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.सुरेश जेथलिया हे 2009 ते 14 या कालावधीत परतूरचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.
जेथलिया हे माजी मंत्री बबनराव लोणीकरांचे कट्टर विरोधक आहेत. आगामी काळात परतूर नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे हे शिंदे गटात दाखल झाले आणि उद्या सुरेश जेथलिया दादा गटात प्रवेश करणार असल्याने दोन्ही विरोधक सत्ताधारी गटात आल्याने बबनराव लोणीकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभं ठाकले आहे.
Discussion about this post