जळगाव । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्याच्या उद्देशाने पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवारी रात्री मुंबईहून विमानाने जळगावी दाखल झाले. त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून राजकीय अज्ञातवासात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची संजय राऊत यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव विमानतळावर संजय राऊत जळगाव मधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश जैन यांची भेट झाली आहे. भेटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर 15 मिनिटे बंददाराआड चर्चा झाली.
राजकीय अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आता आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी जळगावत आलेल्या संजय राऊतांची भेट झाल्यामुळे व बंदद्वार चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वर्तवले जात आहेत.
Discussion about this post