जळगाव । माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते जळगावात दाखल झाले. जळगावावी येताच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सुरेशदादा जैन यांनी रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
माजी मंत्री सुरेश जैन यांनी सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेत राजकीय संन्यास घेतला असल्याचं लेखी पत्राच्या द्वारे कळवले होते. त्यानंतर सुरेश जैन आज जळगावमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, जळगावमधील राजकारणातील मोठे नेतृत्व म्हणून माजी मंत्री सुरेश जैन यांच्याकडे पाहिलं जातं. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश जैन हे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मात्र याच दरम्यान, त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टीकोण असणाऱ्या पक्षाला आपला पाठिंबा राहील असे सुरेशदादा जैन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान आज ग्रामविकासमंत्री गिरीश माहाजन , महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ ,आ. राजूमामा भोळे,प्रताप पाटील यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुरेदादा जैन यांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला















Discussion about this post