जळगाव | प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने विशेष भाड्यावर आणखी दोन उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरत-खुर्दा रोड आणि अहमदाबाद-खुर्दा रोड या दोन गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांना जळगावसह भुसावळ येथील रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
रेल्वे क्रमांक ०९०१९ सुरत-खुर्दा रोड स्पेशल सुरत येथून १६ मे रोजी २३.५० वाजता सुटेल आणि शनिवारी १२.०० वाजता खुर्दा रोडला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०९०२० खुर्दा रोड-उधना स्पेशल ही गाडी १८ मे रोजी खुर्दा रोडवरून १६.३० वाजता
सुटेल आणि सोमवारी उधना येथे पहाटे १ वाजता पोहोचेल, या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोचचा समावेश आहे. ही गाडी नंदुरबार, जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबेल. रेल्वे क्रमांक ०९०१९ ला उधना स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल. रेल्वे क्रमांक ०९४२३ अहमदाबाद-खुर्दा रोड स्पेशल अहमदाबादहून १५, १७, २२ आणि २९ मे रोजी १९.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२ वाजता खुर्दा रोडला पोहोचेल. रेल्वे क्र. ०९४२४ खुर्दा रोड-उधना स्पेशल १७,१९, २४ आणि ३१ मे रोजी खुर्दा रोडवरून १६.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी उघना येथे रात्री १ वाजता पोहोचणार आहे.
Discussion about this post