मुंबई : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. शरद पवार गटाने १० पैकी ८ जागांवर विजय मिळविला असून यानंतर अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे
शरद पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा केला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अनिल देशमुख यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
“अनिल देशमुख हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सत्य असल्याशिवाय ते विधान करणार नाहीत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नक्की येणार आहे. कारण 200 आमदार असतानाही राज्यात काय परिस्थिती आहे? दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे कंबरडं मोडण्याचं काम ह्यांनी केलंय. कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळ नीट हाताळला नाही. बेरोजगारी महागाई प्रचंड वाढती आहे. येणाऱ्या विधानसभेनंतर बारामती मतदारसंघांमध्ये अनेक मंत्री होऊ शकतात”, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.















Discussion about this post