संभाजीनगर । मराठवाडा पाणी प्रकरणी सध्या जोरदार संघर्ष पाहायला मिळत असून या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामधून मराठवाड्यासाठी मोठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे. उत्तर महाराष्ट्रच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थिगिती नाकारली असून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखला आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडलं जाणार आहे. जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशावर सुनावणी झाली. यामध्ये सुप्रीम कोर्टाने जलसंपदा विभागाने दिलेल्या ३० ऑक्टोंबरच्या निर्णयाचे पालन करुन शकते. सर्वोच्च न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करु शकत नसल्याचे म्हणले आहे.
कुठल्या धरणांमधून पाणी सोडलं जाणार?
मुळा (मांडओहोळ मुळा) प्रकल्पातून 2.19 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे.
प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, जापूर) प्रकल्पातून 3.36 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे.
गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी) येथून 0.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे.
गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) येथून पाणी सोडलं जाणार आहे.
Discussion about this post