मुंबई । अजित पवार गटाचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कथित सदनिका लाटल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. कोकाटेंना सत्र आणि जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांची आमदारकी वाचली आहे.
सदनिका लाटल्याच्या प्रकरणात नाशिक सत्र आणि जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवत अटक वॉरेंट काढलं होते. यांनतर मुंबई उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती. कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज केला होता आणि त्याची सुनावणी नुकतीच पार पडली. आज झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी वाचली.















Discussion about this post