मुंबई । शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून सु्प्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांन नोटीस बजावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर नेत्यांना अपात्र ठरवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ आठवड्यांनी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने साधारण अडीच महिन्यांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
मात्र, या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यासंदर्भात जाणून बुजून उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केली होती.
Discussion about this post