नवी दिल्ली । दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या महिनाभरापासून तिहार तुरुंगात बंद आहे. दरम्यान, केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अरविंद केजरीवाल गेल्या महिन्याभरापासून जेलमध्ये बंद होते. त्यांनी ईडीने केलेल्या अटकेच्या कायदेशीरतेला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र ट्रायल कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्यांनतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तातडीने दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली.
आता अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. सीएम केजरीवाल यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाल्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर येणार आहेत. ही आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीसाठी जमेची बाजू आहे.
अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मोकळीक दिली आहे. लोकसभेसाठी 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहे. अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण कराव लागेल.
Discussion about this post