अमरावती । अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सध्याच्या विद्यमान नवनीत राणा यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले.
नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवल्यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे.
काय होते प्रकरण
२०१३ मध्ये नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र मिळाले होते. नवनीत राणा यांना मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते. जात पडळताडणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले होते. त्याविरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जात पडळताडणी समितीचा निर्णय रद्द करत राणा यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्या मोची नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकाकर्ते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता.
Discussion about this post