नवी दिल्ली । यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागांवर यश मिळाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर यश आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान, मविआचे नेते या निकालावर संशय निर्माण करत असून ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा केला जातोययाच दाव्यासह महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीने बॅलेट पेपवर निवडणूक घेण्याची मागणी याचिकेत केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी असेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पुण्यातील एका मतदारसंघात एकूण मतदान हे 3,65,000 इतकं झालं आहे. पण मतमोजणी 3,74,547 इतकी झाली आहे. याचाच अर्थ 9 हजार पेक्षा जास्त मतदानापेक्षा मतमोजणी झाली आहे. जे मतदान केंद्रात मतदानासाठी गेलेच नाहीत तर त्यांचे हे 9 हजार मतं कुठून आली? याचा अर्थ हे मॅनूप्लेशन आहे. हे 10 हजार मतं आली कुठून?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “मी महाविकास आघाडी किंवा राजकीय पक्ष पाहत नाही. पूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतोय की, महाराष्ट्रात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. जी मतं दिलेलीच नाहीत ती मतं आली कुठून?”, असा सवाल त्यांनी केला.
Discussion about this post