भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. सर्वोच्च न्यायालय (SCI) मध्ये कोर्ट मास्टरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे.
अशा परिस्थितीत, सरकारी नोकरी शोधत असलेले आणि प्रतिष्ठित सर्वोच्च न्यायालयात नोकरी मिळवू इच्छिणारे सर्व उमेदवार न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट sci.gov.in वर ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरून निर्धारित तारखांमध्ये भरतीत सामील होऊ शकतात.एकूण 30 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. म्हणून उशीर न करता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज दाखल करा.
एकूण जागांपैकी 16 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 4 जागा अनुसूचित जाती (SC) साठी, 2 पदे अनुसूचित जमाती (ST) साठी आणि 8 पदे इतर मागासवर्गीय (OBC) साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता काय असावी आणि निवड कशी केली याबद्दल जाणून घेऊ…
अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. यासोबतच, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्द आणि कंप्यूटर टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्दांचा वेग असणे आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित स्टेनोग्राफी किंवा सेक्रेटरी पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 30 ते 45 वर्षांच्या मध्ये असलं पाहिजे.
| जाहिरात (PDF) | Click Here |
अर्ज करण्यासाठी मुल्य?
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1500 रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दिव्यांग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या अवलंबितांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील. हे पेमेंट युको बँक पेमेंट गेटवे द्वारे करता येईल. अर्जाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं देखील सांगितलं जात आहे.
किती मिळणार वेतन?
निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 11 अंतर्गत 67 हजार 700 रुपये सुरुवातीचं वेतन असेल. याशिवाय, सरकारी नियमांनुसार इतर भत्ते देखील दिले जातील.















Discussion about this post