मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी उद्या म्हणजेच 07 जूनपासून पुरवणी परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 16 जून असणार आहे.
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना पुरवणी परीक्षेद्वारे परीक्षेची संधी दिली जाते. त्यानुसार ही परीक्षा जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे.
जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत ते पुरवणी परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात. ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर विद्यार्थ्यांना बँकेतून चलनाद्वारे अर्ज करायचे आहेत. यासाठी चलनाद्वारे शुल्क भराव लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 08 जून ते 22 जूनपर्यंत अर्ज भारत येणार आहेत. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना 17 जून ते 21 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरवणी परीक्षा या जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अपयश आलं आहे त्यांनी या वेळेत अभ्यास करून पास होण्याची संधी आहे. अप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
Discussion about this post