चाळीसगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे वरिष्ठ प्राध्यापक आणि विचारधारा प्रशाळेचे संचालक, ज्येष्ठ विचारवंत,सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.म.सु.पगारे यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक सुपडू पुना पगारे यांचे आज सकाळी 11.30 वाजता चाळीसगाव येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ते ९० वर्षाचे होते.आज संध्याकाळी 5.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या चाळीसगाव येथील राहात्या घरुन निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं, तीन मुली असा मोठा परिवार आहे.
Discussion about this post