यावल | तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका युवकाने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत
वसंत जानकीराम पाटील (वय ३५ वर्ष राहणार थोरगव्हाण ) या दारुणाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. मयताचे काका आत्माराम बाबुराव पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी केले. यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कुटुंबियांच्या आक्रोशाने परिसर भावविवश झाला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर तडवी हे करीत आहे .आत्महत्या केलेला तरूण वसंत पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असून त्यांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.















Discussion about this post