जळगाव । शहरातील अयोध्या नगर भागात राहणाऱ्या तरुणीने आई-वडील बाहेर जाताच टोकाचं पाऊल उचललं आहे. कोमल वसंत भावसार (30) असं या तरुणीचं नाव असून तिने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली .
तरुणीचे वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांना धक्का बसला. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी सुसाईट नोट आणि लॅपटॉप जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, शहरातील अयोध्या नगरातील रौनक कॉलनीत कोमल भावसार ही तरुणी वास्तव्यास असून ती बँकेत अकाऊंटन म्हणून नोकरीला होती. तरुणीची आई आणि भाऊ पुण्याला गेले होते तर वडील वर्कशॉपमध्ये कामाला गेले असल्याने ती घरी एकटीच होती. दुपारच्या सुमारास कोमल भावसार हीने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी तीचे वडील कामावरुन घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान पोलिसांना कोमलच्या लॅपटॉप बॅगमध्ये सुसाईट नोट मिळाली आहे. त्यात मम्मी पप्पा सॉरी, मी स्वतःहून आत्महत्या करीत असून यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात
Discussion about this post