देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवड योजनेतील घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठा घोटाळा केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. मात्र या प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल चौकशी समितीकडून सादर करण्यात आला आहे.
या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही. राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचे समितीचे स्पष्ट मत आहे. तसेच मोहिम राबवताना काही अडचणी व त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आली असून त्रुटी व अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे राज्यात ५२ कोटी वृक्ष लागल्याची जमेची बाजू असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे
Discussion about this post