जळगाव । जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी विषप्राशन करून केली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जामनेरमधील पळसखेडा बुद्रुक शिवारात प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची काही महिन्यापूर्वीच परवानगी रद्द करण्यात आली होती. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती पाडण्याचेही आदेश काढण्यात आले होते. संस्थेवर कारवाई होत असताना संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
दरम्यान, मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत पोलिसांकडून किंवा कुटुंबीयांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. कावडिया यांच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. त्यांचे जावई तन्मय भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना, त्यांनी विषप्राशन केलेले नाही. ते काही दिवसांपासून तणावात होते आणि आर्थिक अडचणीतही होते, असे सांगितले. शवविच्छेदनानंतर अहवाल राखीव ठेवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.















Discussion about this post