धुळे । धुळ्याच्या कापडण्यामांडून दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात पतंग उडवताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पतंग उडवत असताना शाळकरी विद्यार्थ्याचा तीन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रक्षित प्रभाकर पाटील असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रक्षित हा इयत्ता ६वीमध्ये शिकत होता. घटनेच्या दिवशी रक्षित शाळेत जायला निघाला होता. यादरम्यान वाटेत त्याला आपले मित्र पतंग उडवत असल्याचे दिसले आणि त्याला पतंग उडवण्याचा मोह अनावर झाला.
रक्षित पतंग उडवण्यासाठी इमारतीवर गेला असता त्याचा पाय घसरला. पाय घसरल्याने रक्षित खाली कोसळला. आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या इमारतीचे काम सुरू असून मजूर कामावरती आलेले नसताना ही घटना घडली. रक्षितच्या जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.















Discussion about this post