मुंबई । वृंदावनचे कथावाचक अनिरुद्धाचार्य हे मुलींबद्दलच्या त्यांच्या अलिकडच्या विधानामुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी बॉलिवूडबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे.त्यांनी बॉलिवूडची तुलना ‘ब्रिटिश राज’शी केली आणि बॉलिवूड चित्रपट भारतीय संस्कृतीचा अपमान करत असल्याचा आरोप केला. त्यांनी रणवीर सिंग आणि अमिताभ बच्चनवर लोकांची दिशाभूल करण्याचा आरोपही केला.
अनिरुद्धाचार्य याबाबत बोलताना म्हणाले की, चित्रपटांमध्ये सुना आणि मुलींना अशा कपड्यांमध्ये दाखवलं जातंय की, ज्याचा समाज आणि मुलींवर वाईट परिणाम होतोय. आता मुलींनाही चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे कपडे घालायचे आहेत.
रणवीर सिंहचे उदाहरण देताना अनिरुद्धाचार्य म्हणाले की, केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही नग्न होणं चुकीचं आहे. रणवीरबद्दल बोलताना ते म्हणाले की, जर इतक्या पैसेवाल्या स्टारनं अशा प्रकारे नग्न फोटो काढले, तर ते बरोबर आहे का? माझा यालाच विरोध आहे.
पुढे बोलताना अनिरुद्धाचार्यांनी अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या ‘जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है…’ या गाण्याचा उल्लेख केला. परखड वक्तव्य करत ते म्हणाले की, “मग बच्चन साहेब त्यांच्या मुलांना आणि कुटुंबातील भावी पिढ्यांना दारू पाजत असतील. ते म्हणतात की जर आमचे मूल चित्रपट पाहायला गेले आणि अमिताभ त्याला दारू पिण्यास शिकवले तर तोही दारू पिईल. हे समाजाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल…”
मग त्यांनी यो यो हनी सिंगच्या ‘ब्लू है पानी पानी’ या गाण्याचा उल्लेख केला आणि म्हटलं की, महिलांना कमी कपड्यांमध्ये उभं केलं जातंय, हे पाहून आपली मुलं काय शिकतील…? अशा चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, ज्यामध्ये अश्लीलता दाखवली जाते.
Discussion about this post