नंदुरबार । सुरतहुन अयोध्या जाणाऱ्या आस्था विशेष रेल्वेवर नंदुरबारजवळ दगडफेक करण्यात आली. यात एक पोलिस जखमी झाला आहे. शहर पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी घटनास्थळावरून एका मद्यपीसह मनोरुग्णाला ताब्यात घेतले आहे. मनोरुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, दुसन्या संशयिताची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. संशयित मद्यमी नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
आस्था विशेष रेल्वे रविवारी रात्री १०.३० वाजता नंदुरबार स्थानकात आल्यानंतर एस- ७, एस-११, एस-१२ व एस- १३ क्रमांकाच्या डब्यातील प्रवाशांनी नंदुरबारच्या एक किलोमीटर आधी गाडीवर दगडफेक झाल्याची रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना माहिती दिली. यामुळे गाडी बांधवून चौकशी करण्यात आली. यात गाडीचे कोणतेही नुकसान अथवा कोणी प्रवासी जखमी झालेले नसल्याने रात्री ११.१० वाजता गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्ष्ात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी एक संशयित आरोपी दारूच्या नशेत तर दुसरा मनोरुग्ण दगड मारत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी एक संशयित दारूडा आणि एक मनोरुग्णास ताब्यात घेतले. किशोरसिंग तिलप्तीय (५०, रा. तरोडा बु. नदिड) असे मद्यपी संशयिताचे नाव आहे
Discussion about this post