जळगाव । जळगाव जिल्हा कारागृहमध्ये बंदिवान कैद्यांच्या दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. या घटनेत एक बंदिवान गंभीर जखमी झाला असून इतर काहीजण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्हा कारागृहामध्ये बंदी वाहनांसाठी कॅन्टीनच्या सामानावरून कारागृहातील बॅरेक क्रमांक १ ते ४ आणि ९ ते १२ येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैद्यांमध्ये जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे दगडफेकीत रूपांतर होऊन या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड (वय 30 रा. चाळीसगाव) हा बंदीवान कैदी जखमी झाला असून त्याच्या नाकाला ,डाव्या पायाला जबर इजा झाली आहे .तर इतर बंदिवान किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. हा वाद कोणत्या कारणासाठी झाला याची माहिती समोर आलेली नसून घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक जिल्हा कारागृहात दाखल झाले असून याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच घटनेबद्दल जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .
Discussion about this post