हरियाणातील बहादूरगडमध्ये आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी नफे सिंग एका ओळखीच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावरून परतत होते. तेव्हा काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
हत्येला अनेक तास उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपींचा सुगावा लागू शकलेला नाही. नफे सिंगच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी दोन डीएसपी आणि विशेष टास्क फोर्स तपासात तैनात करण्यात आले आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या फॉर्च्युनर कारवर मागून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. गाडीवर 40 ते 50 वेळा गोळीबार केला. या हल्ल्यात केवळ नफे सिंग राठी यांचा मृत्यू झाला नाही, तर त्यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यालाही प्राण गमवावे लागले आहेत.
नफे सिंग यांच्यावर हल्ला झाला, त्यावेळी त्यांच्या कारमध्ये एकूण पाच जण उपस्थित होते. ड्रायव्हरसोबत नफे सिंग पुढच्या सीटवर बसले होते, तर त्यांचे तीन सुरक्षा रक्षक मागच्या सीटवर बसले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास हा हल्ला झाला. नफे सिंग आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाला अनेक गोळ्या लागल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. त्यांच्या वडिलांनी सीएम मनोहर सिंग खट्टर यांना अनेकवेळा भेटून सुरक्षेची विनंती केली होती, पण कोणीही ऐकलं नाही. आता त्यांच्या वडिलांना जीव गमवावा लागला आहे.
त्यांच्या इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही मांडीला आणि खांद्यावर गोळ्या लागल्या. त्यांच्या ताफ्यात इतर अनेक वाहने धावत होती. त्यांचा मुलगा माध्यमांशी बोलताना म्हणाला की, वडिलांनी सुरक्षा मागितली होती. पण त्यांना मिळाली नाही. नफे सिंह यांचा मुलगा जितेंद्र राठी यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या वडिलांनी सीएम मनोहर सिंग खट्टर यांना अनेकवेळा भेटून सुरक्षेची विनंती केली होती, पण कोणीही ऐकलं नाही. आता त्यांच्या वडिलांना जीव गमवावा लागला आहे. करण्यात आली.















Discussion about this post