जळगाव । राज्यस्तरीय प्राध्यापक चाचणी परीक्षा(सेट) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत जळगाव केंद्रावर आयोजित केली जाणार असून या परीक्षेचे संपूर्ण नियोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मार्फत करण्यात येणार आहे.
या परीक्षेकरीता जळगाव शहरातील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील परीक्षा केंद्र स्वामी विवेकानंद भवन -अ (केंद्र सांकेतांक क्रमांक १४०१), स्वामी विवेकानंद भवन -ब (केंद्र सांकेतांक क्रमांक १४०२) , स्वामी विवेकानंद भवन -क (केंद्र सांकेतांक क्रमांक १४०३) , शिक्षणशास्त्र महाविद्यालय (केंद्र सांकेतांक -१४०४), के.सी.ई. ए.टी. झांबरे माध्य. महाविद्यालय (केंद्र सांकेतांक क्रमांक १४०५), खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च सेंटर (आयएमआर) (केंद्र सांकेतांक -१४०६), खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (केंद्र सांकेतांक -१४०७) या सात केंद्रावर सेट परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेकरीता २९३६ विद्यार्थी विविध विषयांकरीता प्रविष्ट होणार आहे. असे ४० वी सेट परीक्षेचे संपर्क व्यक्ती तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कळविले आहे.
Discussion about this post