जळगाव । क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा परिषद,जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १७ वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी आयोजित राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा दि. १४ व १७ ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी उद्या दि.१७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा संघटनेचे तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांच्या हस्ते होत आहे.
या स्पर्धेत १४ वर्षे मुले व १७ वर्षे मुले यांचे प्रत्येकी नऊ संघ, तर १७ वर्षातील मुलींचे ८ संघ यांचा सहभाग निश्चित झाला असून या स्पर्धा बाद पद्धतीने खेळवल्या जाणार आहेत.
या स्पर्धेतील ३ विजयी व ३ उपविजयी संघांना तसेच विजयी व उपविजयी संघातील प्रत्येक खेळाडूला सुवर्ण व रजत पदक तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला एक सुवर्ण पदक असे पारितोषिके जळगाव जिल्हा संघटने मार्फत जैन स्पोर्ट्स अकॅडमी, गोदावरी फाउंडेशन, पींच बॉटलिंग व स्पोर्ट्स हाऊस यांच्या माध्यमाने देण्यात येणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीयस्तरीय खेळाडू परिश्रम घेत असून त्यांना आज दि.16 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कार्तिक चव्हाण यांच्या हस्ते शूज व किट वाटप करण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे सचिव फारूक शेख व जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांची उपस्थिती होती.
दि. १७ ते २० ऑगस्ट अशा ४दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी व क्रीडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.















Discussion about this post