Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; दुकाने, हॉटेल्स 24 तास उघडी ठेवता येणार, कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचं काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 2, 2025
in महाराष्ट्र
0
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; दुकाने, हॉटेल्स 24 तास उघडी ठेवता येणार, कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचं काय?
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना २४ तास सुरू ठेवण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

कोणती दुकाने सुरू राहणार?
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार, आता सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा आणि इतर आस्थापना यातील नोकरीच्या शर्तींचे आणि नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या इतर सेवाशर्तीचे विनियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींकरिता तरदूत करण्यासाठी महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.

मॉल आणि व्यापारी संकुलचं काय?
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनिय़मन) अधिनियम, 2017 मधील कलम 11 अन्वये एखाद्या क्षेत्रासाठी किंवा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी आणि निरनिऱाळ्या कालावधीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या आस्थापनांच्या किंवा आस्थापनांच्या वर्गाच्या किंवा वेगवेगळ्या परिवास्तू, व्यापारी संकुल किंवा मॉल यांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचे अधिकार राज्य सरकारला प्रदान करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचं काय?
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 च्या कलम 2 (2) मध्ये ‘दिवस’ याची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा 24 तासांचा कालावधी अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच सदर अधिनियमाच्या कलम 16 (1) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येतील. मात्र, तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून 24 तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल अशी तरतूद आहे.

कोणत्या दुकानांवर बंदी किंवा निर्बंध?
राज्य सरकारने 19 डिसेंबर 2017 च्या अधिसूचनेद्वारे राज्यातील विविध क्षेत्रातील परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा प्रकारच्या सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने, थिएटर आणि सिनेमा प्रदर्शित करणारे गृह या आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या होत्या. त्यातून थइएटर आणि सिनेमा प्रदर्शित करणारे गृह वगळण्यात येऊन 31 जानेवारी 2020 रोजी नवीन अधिसूचना काढण्यात आली. यानुसार, केवळ परमिट रूम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित आहेत. त्यामुळे या आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार नाहीत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळ्यातून काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; 3 वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार

Next Post

जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ; जळगाव शहरातील खळबळजनक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ; जळगाव शहरातील खळबळजनक घटना

जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ; जळगाव शहरातील खळबळजनक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page