बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी आणि रिव्यूअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑफिसर पदावर तुम्ही काम करु शकतात.
स्टेट बँकेने या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, तुम्हाला या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाहीये. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ एप्रिलपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२५ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमबीए किंवा एक्झिक्युटिव्ह एमबीए पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत १० वर्षांचा कामाचा अनुभव असावा. तर एसबीआय ईआरएस रिव्यूअर पदासाठी SMGS-IV/V ग्रेडमधून SBI/e-ABs रिटायर्ड झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
स्टेट बँकेत रिव्ह्यूवर पदासाठी ५०,००० ते ६५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे रहोणार आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी २८-५५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी भरती ही कोलकत्ता येथे होणार आहे.
Discussion about this post