मुंबई । एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १५ टक्के भाडेवाढ केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना जोरदार झटका बसला आहे. आधीच महागाईनं बेजार झालेल्या नागरिकांनी एसटी बस भाडेवाढ झाल्यानं संताप व्यक्त केला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी . या भाडेवाढीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“एसटी भाडेवाढीची मला कल्पनाच नव्हती,” असं सांगत सरनाईक यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. प्रताप सरनाईकांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14.95 टक्के एसटी वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
धाराशीवचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. “एसटी भाडेवाढ एकत्रितपणे केली ती प्रशासनातील काही लोकांच्या चुकीमुळे झाली आहे. मलाही भाडेवाढीची कल्पना नव्हती. हा निर्णय प्राधिकरण घेते. मलाही दुसर्या दिवशी कळाले. मला ही याचे आश्चर्य वाटले,” असे सरनाईक यांनी म्हटलं आहे. सरनाईक यांच्या या विधानामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना न विचारताच भाडेवाडीचा निर्णय घेतल्याचे दिसते.
Discussion about this post