सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ()
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात २०८ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.एसटी महामंडळ यवतमाळ येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३३ असावे.मोटर मेकॅनिकसाठी ७५ पदे रिक्त आहे. शिटमेटल पदासाठी ३० जागा रिक्त आहेत. डिझेल मेकॅनिकसाठी ३४ जागा रिक्त आहेत. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकसाठी ३० पदे रिक्त आहेत. वेल्डरसाठी २० जागा रिक्त आहेत. टर्नर आणि पेंटर जनरल या पदांसाठीही रिक्त जागा आहेत.
१०वी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना ५९० रुपये अर्ज भरायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Discussion about this post