दहावी पास असलेल्या तरुणांना राज्याच्या एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नाशिक येथे होणार आहे. एकूण ३६७ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आधी जाहिरात वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.
एसटी महामंडळात कोणत्या पदांसाठी भरती?
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वेल्डर, पेन्टर,डिझेल मॅकेनिर अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.
कोण अर्ज करू शकेल?
एसटी महामंडळातील या नोकरीसाठी १०वी पास असणे अनिवार्य आहे. याचसोबत इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. आयटीआय पदवीधर उमेदवारदेखील विविध पदांसाठी इक्ज करु शकतात.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे.यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी http://www.apprenticeshipindia.gov.inया वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावे. यानंतर अर्ज भरुन एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे द्यायचा आहे.११ ऑगस्टपूर्वी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
Discussion about this post