नाशिक : नाशिकमधील पेठ-गुजरात महामार्गावरील रामशेज किल्ल्याजवळ एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यात ट्रकचा चालक जागीचं ठार झाला असून एसटीचा चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये १२ प्रवाशांना मार लागला. त्यांना एसटीतील जखमी प्रवाशांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रामशेज किल्ल्याजवळ एसटी सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. जोराचा आवाज झाल्यामुळे लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु ट्रक चालक जागीचं ठार झाला होता. अपघातामध्ये १२ प्रवाशांना मार लागला. नाशिक जिल्हा सिव्हिल रुग्णालयात सगळ्या प्रवाशांवरती उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी अपघात झाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर दोन्ही गाड्या बाजूला घेतल्या. या अपघात प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी पुण्याकडे निघाली होती, त्यावेळी अपघात झाला आहे. समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही चालकांना गंभीर मार लागला होता. सगळ्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एसटीच्या चालकाची प्रकृती सुध्दा गंभीर आहे. ट्रक चालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सध्या ट्रकच्या चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.















Discussion about this post