राज्यात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतचं चालले आहे. याच दरम्यान आता एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आलीय. एसटीमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 19 प्रवासी जखमी झाले आहेत.
ही घटना मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या माणगावनजीक रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
एसटी बसने कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात घटला आहे. या अपघातातील जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे.
जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईहून नागरिक गावी निघाले होते. अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.
Discussion about this post