धुळे : राज्यातील महामंडळाच्या अनेक एसटी बसेसची दुरावस्था झाली आहे. तरीही त्या बसेस रस्त्यावर धावत आहे.परिणामी जीव धोक्यात घालून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. यातच धावत्या एसटी बसचं मागचं चाक निखळल्याने अपघात झाल्याची घटना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली.सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. अपघातामध्ये सात ते आठ लोक जखमी झाले असून तीन लोक गंभीर जखमी आहेत.
अपघातग्रस्त झालेली बस सोलापूरहून नांदेडला जाण्यासाठी पहाटे निघाली होती. मात्र सोलापुरातील उळे कासेगाव या ठिकाणी एसटी बसचं मागील चाक अचाकन बसपासून वेगळं झालं. बस वेगात असल्याने चाक निखळल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि उलटी झाली.
त्यानंतर बस महामार्गावर रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असल्याने सर्वांनाच एक थरारक अनुभव आला. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या अपघातानंतर एसटी बसेसच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Discussion about this post