सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजेच दहावी पास असलेल्या उमेदवार या भरती अर्ज करू शकतो. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
ही भरती प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत राबविली जात आहे. SSC ने मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल)स्टाफ आणि हवालदार (CBIC आणि CBN) परीक्षा साठी नुकतीच अधिकृत अधिसूचना जारी केली. या भरतीद्वारे ८,३२६ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यापैकी ४८८७ रिक्त जागा मल्टी टास्किंग स्टाफसाठी आहे तर ३४३९ जागा CBIC आणि CBN मध्ये हवालदा पदांसाठी आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याती शेवटची तारीख ३१ जुलै आहे. या अर्जासाठी १०० रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. हे शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२४ आहे. याशिवाय अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ते तुम्ही १७ ऑगस्ट २०२४ पर्यंत करु शकतात.
CBN मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदारासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असावे, तर सीआयबीसीमध्ये हवालदार आणि एमटीएसच्या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्ष आहे. उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली असावी. याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.
SSC MTS टियर १ परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Discussion about this post