पुणे । दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अधिकची दहा मिनिटे देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. शिक्षण मंडळाचे सचिव यांनी याबाबत माहिती दिली.
बारावीची लेखी परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान, होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते 26 मार्च या कालवधीत होणार आहे. या परिक्षांच्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे अधिक वेळ मुलांना पेपर सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचे आकलन होण्यासाठी परीक्षा दलनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे करण्यात येत होते
दहावी बारावी परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मुलांसह पालकांची देखील परीक्षा असते. मुलांना उत्तर पत्रिका वाचता यावी तसेच त्याचा अंदाज घेता यावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप केले जात होते.
मात्र, पेपर फुटीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी व परीक्षा योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची पद्धत गेल्या वर्षीपासून रद्द करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका वाचून प्रत्यक्ष उत्तरे लिहिण्यासाठी उशीर लागत होता. त्यामुळे त्यांना वेळ कमी पडत होता. यामुळे मुलांना वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर मुलांना आणखी १० मिनिटे वाढीव वेळ दिला जाणार आहे. यामुळे त्यांना परीक्षा योग्य पद्धतीने देता येणार आहे.
या परीक्षा या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. सकाळच्या सत्रात ११ वाजता पेपर सुरू होणार असल्याने मुलांना १०.३० वाजता दालनात हजर राहावे लागणार आहे. तर दुपारी ३ वाजता पेपर सुरू होणार असल्याने २.३० वाजता वर्गात येवून मुलांना बसावे लागणार आहे. सकाळच्या सत्रातील पेपर लिखाणाला ११ वाजता सुरुवात होणार आहे. हा पेपर २ पर्यंत सोडवावा लागणार आहे. यानंतर मुलांना २.१० असा वाढीव १० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. तर दुपारी ३ वाजता पेपर लिखाणाला सुरुवात होणार आहे.
Discussion about this post