पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात पार पडली असून यानंतर आता या परीक्षांचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता आहे. अशातच निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आलीये.
महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाबाबत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल १५ मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु बोर्डाने अधिकृतरित्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केली नाही.
गेल्या काही वर्षांचा निकालाचा कल पहिल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतात. दहावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला होता. दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
कुठे पाहता येणार निकाल
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
असा चेक कराल निकाल
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी क्रेडेंशियल भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
त्यानंतर महाराष्ट्र निकाल स्क्रीनवर दिसेल.
हा निकाल डाऊनलोड करता येईल.
Discussion about this post