पुणे । मे महिन्यात महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता 10वी, 12वीच्या पुरवणी परिक्षेचे वेळापत्रक आता जाहीर झालेले आहे. १६ जुलैपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
बारावीच्या सर्वसाधारण विषय आणि ऑनलाईन परीक्षा १६ जुलै ते ०८ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै दरम्यान होणार आहे. दरम्यान परीक्षा संबंधीची सर्व माहिती आणि वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत. समाज माध्यमांवरील व्हायरल वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचना विभागीय मंडळाने दिल्या आहे.
दहावी पुरवणी परीक्षेसंदर्भात प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधी दरम्यान होणार आहे. तर बारावीची पुरवणी परिक्षेसंदर्भात प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही १६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार आहे. बारावीची माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही परीक्षा सात आणि आठ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे.
पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेच वेळापत्रक अंतिम असेल, असे संबंधित प्रशासनाने सांगितले आहे. याच वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असं आवाहन देखील प्रशासनाने केली आहे.















Discussion about this post