पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावी च्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झालेय. या जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्राकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात.
या परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.















Discussion about this post